Breaking News

सीकेटी इंग्रजी माध्यमाचे नेत्रदीपक यश

पनवेल : रामप्रहर वृत्त – शंभर टक्के  निकालाची परंपरा कायम राखत सीकेटी (चांगू काना ठाकूर) इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्ड दहावीच्या निकालात आपला भरीव ठसा उमटवला आहे.

ईशा तारेकर या विद्यार्थिनीने 97 टक्के मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे. सिध्दी सुभाष म्हस्कर, स्नेहल किरण बोरसे, ऋतुजा राजेंद्र पवार या तीन विद्यार्थिनींनी 94.80 टक्के गुण मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे तर तृतीय क्रमांकावर ईशा हिृतेंद्र सुपे या विद्यार्थिनीने 94.40 टक्के गुण संपादन केले आहेत.

या वर्षीच्या निकालाचे वैशिष्टय म्हणजे तब्बल 19 विद्यार्थ्यांनी 90 टक्के हून अधिक गुण मिळवले आहे. तसेच विशेष प्र्राविण्य प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 78 अशी असून प्रथम श्रेणी 79 विद्यार्थी व द्वितीय श्रेणी 29 तर उर्त्तीण दोन अशा प्रकारे  सीकेटी इंग्रजी माध्यम दरवर्षी  प्रगतीचे नवनवीन उच्चांक गाठत भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिरपेचार मानाचे स्थान पटकावत असते.

दहावीच्या अभ्यासाचे योग्य नियोजन, बोर्डाच्या परिक्षेकरता घेण्यात येणार्‍या सराव परीक्षा तसेच शिक्षकांचे सुयोग्य मार्गदर्शन यामुळेच या शाळेतील विद्यार्थी दिवसेंदिवस अधिकाधिक गुण प्राप्त करून विद्यालयाचा नावलौकिक वाढवत आहेत. असे अनेक पाालकांनी सांगितले. तसेच या विद्यालयात शिकल्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे विद्यार्थ्यांनी नमूद केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

माझ्या यशाचे श्रेय मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर तसेच शाळेतील सर्व तज्ञ मार्गदर्शक शिक्षक यांन देते. माझ्या आई वडिलांचा माझ्या यशात मोलाचा वाटा आहे. त्यांनी सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा मला उपलब्ध करून दिल्या. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगेन की शिक्षकांच्या सूचनांचे पालन करा व स्व: तावर विश्वास ठेवा आणि योग्य मार्गावर चालत रहा यश तुमचेच असेल, असे शाळेचे आभार मानत व आपल्या नंतरच्या विद्यार्थ्याना आपल्या यशाचा कानमंत्र देत ईशाने आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply