Breaking News

मुरूडमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; दोघांचा मृत्यू

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. गुरुवारी (दि. 6) तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने दीडशेचा टप्पा ओलांडून दोन रुग्णांचा मृत्यू झाला अहे. तालुक्यातील बोर्ली गावातील एक 60 वर्षीय, तर मुरूड कोळीवाड्यातील 50 वर्षीय पुरुषाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. तालुक्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 155 इतकी झाली आहे. अजून काही जणांचे नमुने घेतले असून, त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. मुरूड तालुक्यात आतापर्यंत 98 रुग्ण बरे झाल्याने त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला. उर्वरित 45 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुरूडचे नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी दिली. प्रशासनाच्या नियमांचे पालन करून आरोग्याची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply