पाच जणांचा मृत्यू; 185 रुग्णांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि.10) कोरोनाचे 197 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 169 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 154 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 28 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 31 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात 169 नवीन रुग्ण आढळले. पनवेल महापालिका क्षेत्रात तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तळोजा सेक्टर 10 सन फ्लॉवर बिल्डिंग, पनवेल वसंत स्मृती एमटीएनएल रोड आणि कामोठे सेक्टर 6 ए थारवानी रेसिडेंसी येथी व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोमवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 26 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1521 झाली आहे. कामोठेमध्ये 45 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1750 झाली आहे. खारघरमध्ये 38 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 1586 झाली आहे.
नवीन पनवेलमध्ये 25 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1452 झाली आहे. पनवेलमध्ये 28 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1448 झाली आहे. तळोजामध्ये सात नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 491 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 8248 रुग्ण झाले असून 6488 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.66 टक्के आहे. 1547 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 193 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात 18 नवे रुग्ण
तिघांचा मृत्यू; दोघे जण बरे
उरण : उरण तालुक्यात सोमवारी (दि.10) कोरोना पॉझिटिव्ह 18 रुग्ण आढळले, तीन रुग्णांचा मृत्यू व दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी सहा, रांजणपाडा, भेंडखळ, बोकडवीरा, भाजी मार्केट, म्हातवली, अंबिलवाडी केगाव, डोंगरआळी केगाव, म्हातवली, मोठी जुई, धुतुम, द्रोणागिरी, वेश्वी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये डोंगरी, धुतुम येथे प्रत्येकी एक असे एकूण दोन रुग्णांचा समावेश आहे. तर मोरा कोळीवाडा, नागाव व केगाव अवेडा येथे प्रत्येकी एक असे एकूण तीन मृत्यू झाले आहेत. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1000 झाली आहे. त्यातील 828 बरे झाले आहे. फक्त 132 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आज पर्यंत 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.