Breaking News

आदिवासी वस्तीवर धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

साईनाथ दरबार सामाजिक सेवा संस्था, खोपोली मठाधिपती योगी भाईनाथ महाराज यांच्या वतीने शिरवली ग्रामपंचायत अंतर्गत भल्ल्याची वाडी येथील दुर्गम आदिवासी वस्तीमध्ये अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. कोरोनामुळे आदिवासींना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. पत्रकार मयूर तांबडे यांनी या परिस्थितीची दखल घेवून विविध सामाजिक संस्थांना मदतीसाठी आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत महंत योगी भाईनाथ महाराज यांनी आपल्या सेवेकर्‍यांसह या वस्तीला भेट देवून पंधरा दिवस पुरेल एवढ्या अन्नधान्याचे वितरण केले. तांदूळ, डाळ, आटा, कडधान्य, मसाले, मीठ, दंतमंजन अशा प्रकारच्या वस्तूंचा यात सामावेश आहे. या कार्यामध्ये पत्रकार मयूर तांबडे, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण भगत, यांच्यासह संतोष पाटील, सुशांत चाळके, समीर पोटे, मनोज नागपाल, दिलीप दुबे या सेवेकर्‍यांनी मोलाचे योगदान दिले.

मठ, मंदिरे ही केवळ आध्यात्मापुरतीच मर्यादित न राहता सामाजिक कार्याची केंद्र बनावी. मनुष्याप्राण्यामध्येही असलेल्या ईश्वरी अस्तित्वाची जाणीव ठेवून आपली मदत योग्य अशा गरजू व गरीबांपर्यंत पोहचवणे हेसुद्धा खरे धर्मपालन आहे.

-महंत योगी भाईनाथ महाराज, साईनाथ दरबार, खोपोली

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply