Breaking News

सात नव्या मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन; प्रस्ताव सादर

नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरनंतर आता मोदी सरकारने आणखी सात नव्या कॉरिडॉरसाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला प्रस्ताव दिला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग 508 किमी लांबीचा आहे, तर नव्या सात कॉरिडॉरच्या माध्यमातून पाच हजार किलोमीटरवर बुलेट ट्रेन धावेल. प्रस्तावित सात नव्या मार्गांचा आढावा घेण्याचे काम रेल्वे मंत्रालयाने एका एजन्सीला सोपविल्याची माहिती एनएचएसआरसीएलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. रेल्वे मंत्रालयाने एनएचएसआरसीएलला दिलेल्या सात बुलेट मार्गिकांची माहिती आकडेवारीसह एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. बुलेट ट्रेनच्या सात मार्गिकांसाठी विस्तृत अहवाल तयार करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply