सात रुग्णांचा मृत्यू; 178 जणांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 10) कोरोनाचे 341 नवीन रुग्ण आढळले असून, सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 178 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 244 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्णांचा मृत्यू झाला, तर 110 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ग्रामीणमध्ये 97 नवे रुग्ण आढळले तर 68 जण बरे झाले आहेत.
महापालिका क्षेत्रात खारघर येथील सेक्टर 10 कोपरा गाव, सेक्टर 19 स्कायलार्क सोसायटी, कळंबोली सत्य संस्कार सोसायटी, कामोठे येथील सेक्टर 22 हावरे निमिन्ती सोसायटी, सेक्टर 9 यशदीप सोसायटी, नवीन पनवेल सेक्टर 16 ललीता निवास येथील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2386 झाली आहे. कामोठेमध्ये 64 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3075 झाली आहे. खारघरमध्ये 38 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 2826 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 48 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2640 झाली आहे. पनवेलमध्ये 47 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2519 झाली आहे. तळोजामध्ये सात नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 665 झाली आहे. एकूण 14111 रुग्ण झाले असून 11827 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी 83.81% आहे. 1956 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 328 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात 21 जण बाधित
दोघांचा मृत्यू; सात रुग्णांना डिस्चार्ज
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – उरण तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे 21 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, दोन रुग्णांचा मृत्यू व सात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये नागाव दोन, जासई दोन, जेएनपीटी टाऊनशिप दोन, वेश्वी दोन, बोकडवीरा, नागाव पोलीस लाईन, मोठी जुई, सावरखार, रमेश पेट्रोल पंपाजवळ जासई, पाणजे, मुळेखंड, पिरकोन, चिरनेर, ओम साई बिल्डींग उरण, विंधणे, गोवठणे, ओ.एन.जि.सी गेट जवळ नागाव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1580 झाली आहे. त्यातील 1253 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 253 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आज पर्यंत 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
महाडमध्ये आठ नवे रुग्ण
महाड : महाडमध्ये गुरुवारी कोरोनाचे नव्याने आठ रुग्ण आढळून आले असून, दिवसभरात 42 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोड अमर एन्टरप्रायजेस रोहीदास नगर दोन, वरंध, आदर्श नगर बिरवाडी, पोलीस लाईन तांबडभुवन, महालक्ष्मी मंदिर जवळ काकरतळे, राजसाई आर्केड मधली आळी सुंदर टॉकीज शेजारी, चांढवे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. महाडमध्ये एकुण 220 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 944 रुग्ण उपचार दरम्यान बरे झाले आहेत. महाडमध्ये कोरोनाच्या 1213 रुग्णांची नोंद झाली आहे.
कर्जतमध्ये 34 नवे पॉझिटिव्ह
कर्जत : कर्जत तालुक्यात गुरुवारी 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आजपर्यंत रुग्ण संख्या 1151 वर गेली आहे. त्यापैकी 865 रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. एक रुग्ण दगवल्याने मृतांची संख्या 46 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये माथेरान मधील चार, कशेळे तीन, बीड तीन, उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील इमारत दोन, शेलू दोन, नेरळ दोन, मुद्रे बुद्रुक, विठ्ठल नगर, कर्जत शहरातील कचेरी रोड, महावीर पेठ, धर्मराज पॅलेस, वसुंधरा निवास, नानामास्तर नगर, हलीवली, कडाव, जांभिवली, आवळस, मांडवणे, नेवळी, डिकसळ, माथेरान रेल्वे क्वाटर्स, नेरळ निर्माण नगरी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
नवी मुंबईत 390 जणांना संसर्ग
नवी मुंबई : नवी मुंबईत 390 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोना बधितांची एकूण संख्या 29 हजार 555 झाली आहे. तर 384 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची 25 हजार 439 झाली आहे. दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 647 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 72, नेरुळ 52, वाशी 62, तुर्भे 66, कोपरखैरणे 69, घणसोली 13, ऐरोली 52, दिघा चार, अशी आहे.