Breaking News

सेवा सप्ताहानिमित्त प्रमाणपत्र वाटप

ठाणे : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने कोकण पदवीधर आमदार व ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे साहेबांच्या प्रयत्नाने शुक्रवारी (दि. 18) कळवा मंडळातर्फे कळव्यातील जनसंपर्क कार्यालय, येथे आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना तसेच प्रमाणपत्र निरंजन डावखरे व महाराष्ट्र प्रदेश सचिव संदिप लेले यांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळी ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, उपाध्यक्षा दिपा गावंड, कळवा मंडळ अध्यक्ष हिरोज कपोते, उपाध्यक्ष श्रीकांत ठोसर, ओम जैस्वाल, सरचिटणीस मनोहर मोतीकर, निता पाटील, सचिव उदय कारेकर, महिला मोर्चा मिनाक्षी पवार, मनोज साळवी, विजय वर्मा, प्रशांत पवार, ठाणे कार्यकारीणी अरविंद कलवार, पॅनल क्र. 9चे प्रमुख दिपक शिंदे, वॉर्ड अध्यक्ष आशुतोष कपोते, वॉर्ड क्र.25चे अध्यक्ष कन्हैयालाल विश्वकर्मा, किशोर चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply