पेण : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाच्या पेण तालुका उपाध्यक्षपदी अविनाश पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे पत्र आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना देण्यात आले.
अविनाश पाटील हे सक्रिय कार्यकर्ते असून, सामाजिक कामात हिरीरिने सहभागी होत असतात तसेच सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे कामही ते करीत आहेत.
पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून तालुका उपाध्यक्षपदाची जी जबाबदारी दिली आहे ती सार्थकी लावून पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी अविनाश पाटील यांनी सांगितले.
या निवडीबद्दल भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा चिटणीस वासुदेव म्हात्रे, सरचिटणीस संजय घरत, रमेश पाटील, नाशिकेत पाटील, आदिनाथ पाटील, महेश घरत, पूजा घरत, संजय कुथे, बळीराम भोईर, गणेश धनावडे, महेश भिकावले आदींसह भाजप कार्यकर्त्यांनी अविनाश पाटील यांना शुभेच्छा दिल्या.