Breaking News

विरोधी पक्षनेते शेताच्या बांधावर

प्रवीण दरेकर यांनी केली माणगावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

माणगाव : प्रतिनिधी – परतीच्या पावसाने माणगाव तालुक्यातील शेतपिकांचे फारमोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी शेतांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली व बाधीत शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि. 18) माणगांव तालुक्यातील उसरघर, माणगाव नगरपंचायत हद्दीतील भादाव व इंदापुर विभागातील रातवड या गावांतील शेताच्या बांधावर जाऊन भात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बाधीत शेतकर्‍यांना दिले.

भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, माणगांव तालुकाध्यक्ष संजय (आप्पा)ढवळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, उपाध्यक्ष चिन्मय मोने, तालुकाध्यक्ष विशाल गलांडे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा शर्मिला सत्वे, माजी तालुकाध्यक्ष यशोधरा गोडबोले, स्मिता भोईर, समन्वय समिती माजी अध्यक्ष नाना महाले, जहेंद्र मुंढे, राजू मुंंडे, योगेश सुळे, उमेश साटम, नायब तहसीलदार भाबड यांच्यासह महसुल व कृषी अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिले आहेत. त्याचा पाठपुरावा करून भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासकीय मदत मिळवून देतील.

-संजय (आप्पा) ढवळे, तालुकाध्यक्ष, भाजप माणगाव

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply