Breaking News

फोर्टी प्लस क्रिकेटप्रेमींनी केला नवीन हंगामाचा शुभारंभ

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

येथील चाळीशी गाठलेल्या मित्रांनी काही वर्षांपूर्वी एकत्र येऊन ’फोर्टी प्लस’ क्रिकेटची स्थापना केली होती.  विजयादशमीच्या मुहूर्तावर (दि. 25) ज्येष्ठ सदस्य रणजीत जैन आणि मधुकर सुर्वे यांच्या हस्ते क्रिकेट साहित्याचे पूजन करून ’फोर्टी प्लस’ने  क्रिकेटच्या नविन हंगामाचा शुभारंभ केला. या वेळी उपस्थितांनी कोरोना संकटानंतर शासनाने आदेश दिल्यावर मैदानात येण्याचा संकल्प केला.

’फोर्टी प्लस’चे संस्थापक गजेन्द्र दांडेकर, कार्याध्यक्ष शशांक शेट्टी, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, बाळा धनवे, यांच्यासह सदस्य शिरीष दिघे, सचिन मनोरे, विनायक परांजपे, विराग फाटक, दिलीप जाधव, दिपक राणे, गिरीश सुर्वे,

सुनिल खातू, जयवंत पिंगळे, तुषार जोशी, जितेंद्र देशमुख, किरण देशमुख, किशोर देशमुख, दिनेश कडू, संदीप देशमुख,चन्द्रकांत ठाकरे, जगदीश पालकर, हर्शल  पारखी, मंगेश म्हसे, विकी गुंजाळ आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply