Breaking News

हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या बलिदानस्थळी दीपोत्सव साजरा

कर्जत : बातमीदार

चलेजाव चळवळीत सिद्धगड येथील जंगलात कर्जत तालुक्यातील दोन क्रांतिकारकांना वीरमरण प्राप्त झाले होते. त्या बलिदान भूमीत क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानने सोमवारी (दि. 16) मध्यरात्री दीपोत्सव साजरा करून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेली ही भूमी शेकडो दिव्यांच्या उजेडात उजळून गेली होती. कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक भाई कोतवाल यांनी 1942 मध्ये चलेजाव चळवळ उभी केली. त्यात कर्जत, अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यातील तरुणांनी  भाग घेतला होता. त्या तरुणांचा मुक्काम डिसेंबर 1942 मध्ये मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे असताना भाई कोतवाल आणि हिराजी पाटील या दोन क्रांतिकारकांना वीरमरण प्राप्त झाले होते. या दोन्ही हुतात्म्यांचा बलिदान स्थळ दिवाळीच्या पाडव्याला दिव्यांनी उजळवून टाकण्याचा उपक्रम क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानने सुरू केला आहे. दिवाळी पाडव्याच्या रात्री अकरा वाजता कर्जत आणि मुरबाड तालुक्यातील तरुण क्रांतिकारक भगत मास्तर यांचे पुत्र भरत भगत यांच्यासोबत सिद्धगडच्या जंगलात पोहचले. तेथे त्यांनी मध्यरात्री बारा वाजता सोबत आणलेल्या शेकडो पणत्या प्रज्वलित केल्या. यावेळी भरत भगत, मुरबाड पं.स.चे माजी उपसभापती दीपक खाटेघरे,  कळंब येथील एकता पतसंस्थेचे अध्यक्ष शिवराम बदे, धनेश राणे, महेश शिंगटे, विजय झांजे, परेश भगत, निलेश गवळी, जितेंद्र भगत, प्रवीण तुपे, विशाल तुपे, आगिवले, नितीन म्हसे, महेंद्र पवार, पंकज गायकर, राहुल गायकर, संजय सोनावळे आदी उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply