Breaking News

उरण बाजारात छोट्या गुढ्या दाखल

उरण : वार्ताहरगुढीपाडव्याचा सण शनिवारी (दि. 6) असल्याने सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पाडव्याच्या निमित्ताने  बाजारात छोट्या आकर्षक गुढ्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. आजच्या काळात बैठी घरे नामशेष होऊन त्या ठिकाणी मोठ्या व उंच इमारती झाल्या आहेत. उंच इमारतीवर गुढी उभारण्यासाठी त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे सोयीस्कर म्हणून छोट्या गुढ्या बाजारात येऊ लागल्या आहेत. छोट्या गुढ्या उरण बाजारात विकावयास आल्या असून नागरिक त्या खरेदी करताना दिसत आहेत. उरण बाजारपेठेतील हरिलाल करसनदास यांचे दुकान 70 ते 80 वर्षांचे आहे. गेली 10 वर्षांपासून लहान गुढीला मागणी वाढली आहे. सदर गुढ्यांची उंची व कलाकुसरीप्रमाणे किंमत असते. या गुढ्या 100 ते 200 रुपयांपर्यंत विकल्या जातात. ब्लॉक सिस्टीममुळे लहान गुढीस मागणी वाढली आहे. गुढ्या खरेदी करण्यासाठी उरण तालुक्यातील ग्रामीण भागातून नागरिक येत आहेत, असे दुकानाचे मालक यश मेहता यांनी सांगितले.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply