Breaking News

पेणमध्ये माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात

पेण : प्रतिनिधी – पर्यावरण व स्वच्छता संतुलनासाठी पेण नगर  परिषदेमार्फत ’माझी वसुंधरा’ या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानात साई मंदिर तलाव परिसरात स्वच्छता करण्यात आली त्याला स्थानिक नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. जैविक अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी शाश्वत निसर्ग पूरक जीवन पद्धती अवलंबण्याचा मार्ग आहे. म्हणून माझी वसुधरा अभियान पेण शहरात राबविला जात आहे, असे नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी या वेळी सागितले.

उपनगराध्यक्षा वैशाली कडू, सभापती सुहास पाटील, तेजस्विनी नेने, नगरसेवक दीपक गुरव, नगरसेविका शहेनाज मुजावर, अर्पिता कुंभार, भावना बांधकर, मुख्याधिकारी अर्चना दिवे, अधिकारी राजेंद्र नरुटे, शिवाजी चव्हाण, शेखर अभंग, अकिता ईसाळ, विलास वडके आदींसह कर्मचारी व नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply