पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपच्या पनवेल शहर सांस्कृतिक सेलच्या वतीने नुकताच मनोरंजन अनलॉक @ पनवेल या संगीत, नृत्य व नाटकाच्या मेजवानीचा यशस्वी कार्यक्रम झाला. या नंतर प्रथमच सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांचा पुन्हा सही रे सही या नाटकाचा लॉकडाऊननंतर पहिला प्रयोग शनिवारी (दि. 2) पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता.
या वेळी भाजपच्या सांस्कृतिक सेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने अभिनेता भरत जाधव यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे पनवेल नगरीत स्वागत करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे गणेश जगताप आदी उपस्थित होते.
कोरोना काळानंतर पनवेलच्या रसिक प्रेक्षकांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने भाजपच्या वतीने पनवेलमधील कलाकारांच्या सहकार्याने या मनोरंजनात कलादर्पण सांस्कृतिक विभाग चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त), नवीन पनवेल यांच्या माध्यमातून बायकोच्या नवर्याच्या बायकोचा खून ही धमाल विनोदी एकांकिका सादर झाली. तसेच सर्व पनवेलकर कलाकारांच्या वतीने संगीत नृत्य मराठी आणि हिंदी गाण्यांची सुरेल मैफल असा एकूणच मनोरंजक असा मनोरंजन अनलॉक @ पनवेल ही एक मनोरंजक पर्वणी पनवेलकर रसिकांना मागील शनिवारी (दि. 26 डिसेंबर 2020) अनुभवायला मिळाली. कोरोना काळातील या पहिल्या कार्यक्रमाला भाजपचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप सांस्कृतिक सेलचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहित केले. यामुळे रसिक बेहद खुश झाले आणि खर्या अर्थाने नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग आयोजनाला वाट मिळाली.