Breaking News

पोलीस दलाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; नवी मुंबईत फक्त नऊ जण बाधित

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबइ पोलीस दलात कोरोनाबाधितांचा आकडा एक हजार 700पर्यंत गेला होता तर मृतांचा आकडा 20 झाला होता. मात्र आता यातील फक्त नऊ जण बाधित राहिले आहेत. यातील आठ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील पोलीस दलाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. कोरोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतर सर्वाधिक काळ पोलिसांना घराबाहेर राहावे लागले. त्यामुळे अनेकांच्या संपर्कात आल्याने पोलिसांमध्ये करोनाचे रुण वाढले होते. पोलीस विभागातील चालक, नाईक, शिपाईपासून ते उपायुक्तांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पसरला होता. त्यांच्यामुळे त्यांचे कुटुंबीयही बाधित झाले होते. हे प्रमाण वाढत गेल्याने नवी मुंबई पोलिसांनी एक काळजीवाहू पथक स्थापन करीत त्यांच्याद्वारे बाधित झालेल्या कर्मचारी व कुटुंबीय यांची काळजी घेतली होती. यामुळे कोरोनाकाळात त्यांना या पथकाची मदत होत वेळेत उपचार मिळत गेले. फक्त नऊ कोरोनाबाधित रुग्ण असून सात जणांवर नेरुळच्या डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात तर एक जणावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत व एक जण घरीच अलगीकरणात आहे.

अतिशय कठीण परिस्थितीतून बाहेर पडत आहोत. बाधितांची संख्या कमी झाली असली तरी आजही नियमित प्रत्येक पोलीस ठाण्याचा आढावा घेतला जात आहे. पोलीस आयुक्त स्वत: काळजीवाहू पथकाकडून दररोज आढावा घेत आहेत. -सुरेश मेंगडे, उपायुक्त, पोलीस

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply