पनवेल : रामप्रहर वृत्त
सचिन तांडेल मेमोरियल फाऊंडेशन, कळंबुसरे संस्थेच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त तसेच संस्थेचे सदस्य कै. रिंकू नाईक यांच्या स्मरणार्थ गुरुवारी (दि. 14) पहिली ते आठवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात 146 विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम कै. रिंकू नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन सुरू करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वेश्वी येथील पीपीएम इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक प्रीतम टकले, तसेच मंत्रालय अधिकारी नंदकुमार पाटील आणि माजी सरपंच तथा कळंबुसरेचे तंटामुक्त अध्यक्ष रामचंद्र पाटील यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार तांडेल यांनी केले. कळंबुसरे गावाला ज्यांचा अभिमान वाटावा अशा दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्यांना या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आग्रहाचे निमंत्रण दिले होते.
या उपक्रमात संस्थेचे सदस्य समीर म्हात्रे, प्रवीण पाटील आदी सदस्य उपस्थित होते. संस्थेच्या सर्व सभासदांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. संस्थेला नेहमी सहकार्य करणारे सचिन पाटील, प्रीतम पाटील, प्रकाश पाटील, सचिन पाटील तसेच वर्षा पाटील आदींचे आभार मानून देणगीदारांचे ही आभार मानण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper