Breaking News

‘इनरव्ही’ल आणि ‘रोटरी’तर्फे ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह प्रोजेक्ट

पनवेल : वार्ताहर

इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हर्नमेंट सर्टिफाईड असलेली द रिसायकलिंग कंपनीच्या सहकार्याने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ई वेस्ट कलेक्शन ड्राइव्ह हा प्रोजेक्ट यशस्वीपणे राबविण्यात आला.

यासाठी वेगवेगळ्या सोसायटी, ऑफिसेसमधून ’ई वेस्ट’ गोळा करण्यात आले. नेहमीच्या सुक्या कचर्‍यासोबत ’ई वेस्ट’ टाकणे हानिकारक आहे. नागरिकांमध्ये याविषयी जागरुकता निर्माण होऊन ’ई वेस्ट’ रिसायकलिंगसाठी वेगळे गोळा व्हावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सुजाण नागरिकांमुळे हा उद्देश नक्की सफल होईल, असे या संस्थाचे म्हणणे आहे.

या उपक्रमाला इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या प्रेसिडेंट ध्वनी तन्ना आणि मेंबर्स, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचे प्रेसिडेंट हर्मेश तन्ना आणि मेंबर्स यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply