Breaking News

रस्त्याची केली तत्काळ दुरुस्ती

नगरसेवक राजू सोनी यांची तत्परता

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी तत्काळ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करून दिल्याबद्दल शहरातील शिवशक्ती मित्र मंडळाने फलक लावून त्यांचे कौतुक केले आहे.

लाईन आळी परिसरातील रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात घडत होते. याबाबत शिवशक्ती मित्र मंडळाच्या सदस्यांनी नगरसेवक राजू सोनी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. तत्काळ नगरसेवक राजू सोनी यांनी विनम्र हॉटेल ते शिवशक्ती सर्कल या भागात रस्त्यांना पडलेले खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवून घेतले. याबद्दल शिवशक्ती मित्र मंडळाने त्यांचे फलक लावून धन्यवाद दिले आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply