Breaking News

रोनाल्डोमुळे युव्हेंट्स विजयी

इटालियन चषक फुटबॉल स्पर्धा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
सुरुवातीलाच पिछाडीवर पडल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलमुळे युव्हेंट्सने इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात इंटर मिलानचा 2-1 असा पराभव केला.
लॉटारो मार्टिनेझ याने नवव्या मिनिटालाच इंटर मिलानला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर रोनाल्डोने 26व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर चेंडूला गोल जाळ्याची दिशा दाखवली. त्यानंतर 35व्या मिनिटाला इंटर मिलानच्या बचावपटूंच्या ढिसाळ कामगिरीमुळे रोनाल्डोने दुसरा गोल करीत युव्हेंट्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पुढील आठवड्यात होणार्‍या परतीच्या लढतीत युव्हेंट्सने ही आघाडी कायम राखली, तर त्यांना 19 मे रोजी होणार्‍या अंतिम फेरीत नापोली आणि अ‍ॅटलांटा यांच्यातील विजेत्याशी लढावे लागेल.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply