Breaking News

मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर दरीत कोसळला; दोघे जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात ढेकू गावाजवळ  शुक्रवारी (दि. 5) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने अवजड कंटेनर 50फूट दरीत कोसळला. दैव बलवत्तर म्हणून वाहन चालक आणि मदतनीस या भीषण अपघातात किरकोळ जखमी झाले. त्यांना तत्काळ खोपोली नगर परिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच डेल्टा फोर्स, महामार्ग पोलीस. आयआरबी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून  महामार्गावर काही प्रमाणात झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली. या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply