कर्जत : प्रतिनिधी
कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरील पादचारी पुलाच्या मुंबई एंड कडील उतरणार्या पायर्या तयार होऊन अनेक महिने झाले परंतु तो सुरू करण्यास जुन्या स्वच्छतागृहाचा अडसर होता. नवीन स्वच्छतागृह बांधून ते प्रवाशासाठी खुले करण्यात आल्याने जुने स्वच्छतागृह तोडायला सुरुवात केली आहे. हे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोन व तीनच्यामध्ये मुंबईच्या दिशेला उतरणार्या पायर्यांचा नवीन पूल उभारण्यात आला आहे. मात्र पायर्या संपतात तेथे जुन्या स्वच्छतागृहाची इमारत असल्याने या पादचारी पुलाचा उपयोग प्रवाशांना होत नव्हता. अखेर रेल्वे प्रशासनाने फलाट दोन व तीन च्या मध्ये पुण्याच्या दिशेला नवीन स्वच्छतागृह तयार केले. ते मागील आठवड्यात प्रवाशांसाठी खुले केले आणि जुने स्वच्छतागृह तोडण्याची सुरुवात केली आहे.