Breaking News

‘कमकुवत’ नाही ‘मजबूत’ सरकार हवे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

चित्रपट, नाटक आणि कला क्षेत्रातील 900पेक्षा जास्त कलाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. ‘कमकुवत’ नाही ‘मजबूत’ सरकार हवे, असे म्हणत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कलाकारांनी मोदी यांना पाठिंबा दर्शवला आहे.

शंकर महादेवन, विवेक ओबेराय, पंडित जसराज, रिता गांगुली, कोयना मित्रा, अनुराधा पौडवाल यांच्यासह चित्रपट आणि कला क्षेत्रातील 900पेक्षा जास्त दिग्गज ‘नेशन फर्स्ट’ या बॅनरखाली एकत्र आले आहेत. एक परिपत्रक काढत कलाकारांनी पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभे राहिले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि मोदींची देशाला आवश्यकता आहे. देशाला आताच्या घडीला कमकुवत नाही, तर मजबूत सरकारची आवश्यकता आहे असे या कलाकारांनी म्हटले. कोणत्याही दबावात न येता आणि पूर्वग्रह मनात न ठेवता मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे.

कलाकारांनी संयुक्तपणे जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची सध्या आवश्यकता आहे असा आमचा दृढ विश्वास आहे. दहशतवादाचे आव्हान जेव्हा आपल्यासमोर उभे असते तेव्हा मजबूत सरकारची आवश्यकता असते. गेल्या पाच वर्षांमध्ये देशाने भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि विकासाभिमुख प्रशासन पाहिले आहे. त्यामुळे विद्यमान सरकारला पुन्हा निवडून देण्याची आवश्यकता आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply