Breaking News

नागोठण्यात लोककलेच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती

नागोठणे : प्रतिनिधी

रोहे येथील स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था आणि राजिप आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठणे परिसरात ठिकठिकाणी लोककलेच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. 

नागोठणे शहरात एसटी बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच वाकणनाका येथे मी जबाबदार, कोविड लस सुरक्षित आहे, कोरोना अजून संपलेला नाही, मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा, सॅनिटायझर किंवा साबणाने वारंवार आपले हात स्वच्छ धुवा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, आरोग्यदायी राष्ट्राची उभारणी – सुरक्षित जननी विकसित धरणी, पहिल्या अपत्यासाठी मातेला पाच हजाराचा लाभ, बाळाच्या आरोग्यासाठी योग्यवेळी लसीकरण करा, बेटी बचाओ, बेटी पढावो या माध्यमातून आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली.

जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेंद्र भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वयंसिद्धा संस्थेच्या सुचिता साळवी नेतृत्व करीत असलेल्या या जनप्रबोधनाच्या कार्यात सुचित जावरे, अमृता शेडगे, प्रांजली पाटील, श्वेता खारकर, प्रतीक कोळी, तुषार राऊळ, प्रसाद अमृते, कुणाल घुगे हे कलाकार सहभागी झाले होते. या वेळी ग्रामपंचायत सदस्य अतुल काळे, राकेश जावरे व मुस्तफा सैफी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply