दुबई ः वृत्तसंस्था
दुबईत सुरू असलेल्या टी-20 लीगमध्ये राजकोट थंडर्स संघाचा पुणेकर फलंदाज अमय सोमण याने वादळी खेळी केली. त्याने 61 चेंडूंत 167 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीत 15 चौकार व 14 षटकारांचा समावेश आहे.
अमेयने कारा डायमंड्स संघाविरुद्ध खेळताना पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले होते. त्याने 19 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यात आठ चौकार व तीन षटकार खेचले. त्याच्या या फटकेबाजीने थंडर्स संघाने पहिल्या पॉवर प्लेमध्ये 74 धावांचा डोंगर उभा केला. अमेयची ही फटकेबाजी अशीच सुरू राहिली आणि पहिल्या 10 षटकांत थंडर्सने 127 धावा केल्या. त्यात अमेयच्या 83 धावांचे योगदान होते. पुढील 10 षटकांत अमेयने चौकारापेक्षा अधिक षटकार खेचले. त्याने 37 चेंडूंत शतक पूर्ण केले. यात फक्त चौकार व षटकारांनी 144 धावा कुटल्या, तर 23 धावा या एकेरी व दुहेरी पद्धतीने केल्या.
अमेयच्या फटकेबाजीच्या जोरावर राजकोट थंडर्स संघाने 20 षटकांत कारा डायमंड्स संघाविरुद्ध 3 बाद 261 धावांचा डोंगर उभा केला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना डायमंड्सचा डाव 15.4 षटकांत 103 धावांवर गडगडला. राजकोट थंडर्स संघाने हा सामना 158 धावांनी जिंकला.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper