कोरोना आला तेव्हा सरकार ‘मातोश्री’त

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक भावनिक ट्विट केले आहे. या ट्विटनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

आज जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात. पण, माझे तर म्हणणे आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री आपले घर कोरोनापासून सुरक्षित ठेवून शकत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकार संभ्रमावस्थेत आहे, असेही ते म्हणाले आहेत.

कोरोनाची सुरुवात झाली तेव्हापासून भाजपचा तळागाळातला कार्यकर्ता रस्त्यावर उतरला होता. जेव्हा सरकार क्वारंटाइन झाले होते. कोरोनाचा पिक टाइम होता तेव्हा सरकार मातोश्रीत बसले होते. त्यावेळेला विरोधी पक्ष नेते, कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरुन लढाईत काम करत होते. त्यामुळे सरकार म्हणून आपण लोकांमध्ये जावे जेणेकरून या आरोग्य व्यवस्थेला ठिकठाक करता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोत्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, असे आव्हाडांनी ट्विट करीत म्हटले होते. हाच धागा पडकत प्रवीण दरेकर यांनी आव्हाडांना व मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply