Breaking News

मुरूड आयटीआयमध्ये मतदानाविषयी जनजागृती

अलिबाग : जिमाका : मुरूड येथील शासकीय औद्योगिक संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी देखील याविषयी जाणून घेतले. मतदार जागरूकताविषयक स्वीप समितीचे प्रमुख सुनील जाधव यांनी मतदानाचा हक्क कशा रीतीने बजावता येईल, याची माहिती उपस्थित विविध ट्रेडसमधील विद्यार्थ्यांना दिली आणि त्यांच्याकडून मतदानासंदर्भात संकल्पपत्रे भरून घेण्यात आली. निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असतो. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे, असे सुनील जाधव या वेळी म्हणाले. मुरूडचे तहसीलदार, तसेच गटविकास अधिकारी यांच्यासह विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply