Breaking News

अलिबागच्या हॅम रेडियो संघाचे सुयश

देशात मिळवला तृतीय क्रमांक

अलिबाग ़: प्रतिनिधी

आपत्ती काळात हॅम रेडीओ ऑपरेटर्सनी जास्तीत जास्त अंतरापर्यंत संपर्क साधण्याची क्षमता आजमविण्यासाठी अमॅच्युअर रेडीओ सोसायटी ऑफ  इंडियाने (एआरएसआर) अखिल भारतीय स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत अलिबागहून सहभागी झालेल्या संघाने एकूण 102 क्यूएसओ गुण मिळवून देशात तृतीय क्रमांक मिळवला.

एआरएसआर दर वर्षी हॅम रेडियो चालकांना प्रोत्साहन देण्याचे हेतुने स्पर्धा आयोजित करते. यंदा 27  व 28 फेब्रूवारी 2021 रोजी ही स्पर्धा घेण्यात आली होती. या वर्षी स्पर्धेत एकूण 42 हॅम संघानी भाग घेतला होता. अलिबाग येथे उभारण्यात आलेल्या रेडीओ केंद्राच्या माध्यमातून अलिबागचे दिलीप बापट, मुंबईचे ज्येष्ठ हॅम रेडीओ ऑपरेटर व्हीयुटूएसव्हीएस सुधीर शहा, व्हीयुटू युपीएक्स चारुदत्त उपलाप, व्हीयुथ्रीआर आरएचयू राजेश हुद्दार चौघांजणांनी या स्पर्धेत भाग घेऊन जगभरात संदेश पाठविले होते. त्यासाठी हॅम रेडियो व इतर साहित्य मुंबईहून आलेल्या सहकार्‍यांनी आणले होते तसेच दिलीप बापट यांनी आपल्याकडील रेडियोचाही वापर केला होता. 

आपत्ती व्यवस्थापनावेळी आपण जास्तीत जास्त किती लांब अंतरावर किती संपर्क करु शकतो, याची रंगीत तालीम म्हणून या स्पर्धेकडे पहिले जाते. एचएफव्ही, एचएफ यु एचएफ, एफटीएट अशा प्रकारचे वेगवेगळे प्लॉटफार्म संपर्कासठी वापरले जातात. या सर्व प्रकारातून अलिबाग येथून इंडोनेशिया, मलेशिया, अबुधाबी, मस्कत, मिडल इस्ट तसेच भारतभर संपर्क साधण्यात आला होता.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply