
पनवेल : येथील महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू असून, भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कोविड वॅक्सिन सेंटरला भेट देत लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य केले. या वेळी भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप, सरचिटणीस गौरव कांडपिळे, उपाध्यक्ष अभिषेक भोपी, आकाश बाटी, खांदा कॉलनी युवा मोर्चाचे सचिन सातपुते, कादिर शेख, देवंशी प्रभाले, मनोज परदेशी आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper