Breaking News

सुधागडातील रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; आमदार रविशेठ पाटील यांच्या पाठपुराव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रतिसाद

पाली, पेण : प्रतिनिधी

आमदार रविशेठ पाटील यांच्या पाठपुराव्याने केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पेण विधानसभा मतदार संघातील रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे. पेण तालुक्यातील वाशी-वढाव-काळेश्री रस्त्याकरिता 4.86 कोटी व सुधागड तालुक्यातील उद्धर-कुंभारघर-महागाव-चंदरगाव-हातोंड-गोंदाव रस्त्यासाठी 6.76 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार रविशेठ पाटील यांनी नुकताच नवी दिल्ली येथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी निधीची मागणी केली. या वेळी माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी उपस्थित होते. ना. गडकरी यांनी रस्तेविकासासाठी निधी मंजूर केल्याचे पत्र आमदार पाटील यांना दिले. पेण सुधागड विधानसभा मतदार संघातील रस्ते विकासासाठी ना. नितीन गडकरी यांनी भरीव निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल केंद्र सरकार व ना. गडकरी यांचे आमदार रविशेठ पाटील आभार मानले. आमदार रविशेठ पाटील यांनी आपल्या मतदार संघातील रस्त्यांची सुधारणा व मजबुतीकरण यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचा सततचा पाठपुरावा व प्रयत्न यामुळे सुधागड तालुक्यातील अनेक गावे, आदिवासी वाड्यापाड्यांना जोडणारे रस्ते दर्जेदार व सुस्थितीत येणार असल्याने पेण व सुधागडातील जनतेने आमदार पाटील यांचे आभार मानले आहेत.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply