Breaking News

सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांची तत्परता

पनवेल ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात परिसरात अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या संदर्भात कोरोना प्रतिबंधक नियमानुसार सिडको कार्यालयात विचारणा करण्यास जाण्याचीही बंदी असल्यामुळे नगरसेवक व नागरिकांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला होता. ही बाब पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांना समजताच त्यांनी मध्यस्थी करून सिडको पाणीपुरवठा अधिकारी व खारघर मंडलातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकार्‍यांसोबत झूम अ‍ॅपद्वारे ऑनलाइन मीटिंग घडवून आणली.
हेटवणे व नवी मुंबई पालिकेद्वारे रोज किती एमएलडी पाणी येते? मायक्रो टनेलच्या तांत्रिक अडचणी? पाण्याचे वितरण कसे केले जाईल? अधिक पाण्याच्या व्यवस्थेसाठी होत असलेले प्रयत्न, पनवेल महानगरपालिकेला दैनंदिन अहवाल देण्याची व्यवस्था व इतर अनेक विषयांवर या वेळी सखोल चर्चा झाली. शिवाय ज्या सेक्टरमध्ये पाणीपुरवठा कमी होत आहे, त्या ठिकाणी नामांकित टाटा कन्सलटिंग सर्व्हिसेसतर्फे पाहणी व तपासणी करण्यात येईल. यापुढे टँकरद्वारे पाणी पुरवण्यासाठी अडचणी येणार नाहीत व लवकरच पाण्याचे वितरण सुरळीत होईल, अशी ग्वाही या वेळी सिडको अधिकार्‍यांनी दिली.
या बैठकीस सिडकोचे मुख्य अभियंता राजेंद्र धायतकर, कार्यकारी अभियंता गजानन दलाल, अधीक्षक अभियंता प्रणिक मूळ यांच्यासह भाजप खारघर मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, हरेश केणी, प्रवीण पाटील, नगरसेविका आरती नवघरे, नेत्रा पाटील, नगरसेवक निलेश बाविस्कर, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव तसेच सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply