Breaking News

उलवे नोडमध्ये कोविड केअर सेंटर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने तसेच ग्रामस्थ मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या सहयोगातून उलवे नोडमधील कोपर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात 60 बेड्सचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या रविवारी (दि. 2 मे) सकाळी 11 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व आमदार आशिष शेलार, माजी राज्यमंत्री व आमदार रविशेठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कोरोना महामारीमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होणार असून, त्या अनुषंगाने सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी दिली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply