Breaking News

लोकमान्य सोसायटीतर्फे दोन नवीन योजना सुरू

पनवेल : रामप्रहर वृत्त

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी आरोग्य विमा संरक्षणासह (कोविड 19सहित) लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव योजना सुरू करत आहे. या योजनेमध्ये सुरक्षा समृद्धी व सुरक्षा समृद्धी अ‍ॅडवांटेज या दोन प्रकारांचा समावेश आहे. ही मुदत ठेव योजना एक वर्षाची मुदत ठेव योजना असून 8.50 टक्के व्याज दराने उपलब्ध आहे. ह्या योजनेत गुंतवणूकदारांना आरोग्य विमा संरक्षणासह (कोविड 19 सहित) एक लाखापर्यंत विमा सरंक्षण मिळते. ग्राहकांना या योजनेत कमीतकमी एक रकमी दोन लाख किंवा एक हजाराच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल, ह्या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. दोन लाखांच्या गुंतवणुकीवर एक लाख आरोग्य विमा संरक्षणासह (कोविड 19 सहित) प्रतिदिन अशी 50 दिवसांपर्यंत दररोज 2000 रुपयांपर्यंत इस्पितळ खर्च मिळतो, तसेच 2.50 लाख रुपये किंवा जास्त गुंतवणुकीवर सभासद लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव अ‍ॅडवांटेज  प्लॅनमध्ये सहभागी होऊ शकतात. ह्यात एक लाख आरोग्य विमा संरक्षणासह (कोविड 19 सहित) प्रतिदिन अशी 25 दिवसांपर्यंत दररोज 4000 रुपयांपर्यंत इस्पितळ खर्च मिळतो. एकांपेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे मुदत ठेव ठेवल्यास ठेवीच्या वेळी ठेवीदाराकडून प्रथम धारकाच्या नावाने पॉलिसी जारी केली जाईल. ह्या योजनेत 18 ते 65 वयोगटातील सभासद सहभागी होऊ शकतात. ही योजना 3 मे ते 31 जुलै 2021 ह्या मर्यादित कालावधीतच कार्यन्वित राहील. ही योजना लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी व आयसीआयसीआय लोंबार्ड यांच्यामधील संयुक्त करार विद्यमानाने अंमलात आली असून पॉलीसी सेटलमेंट आयसीआयसीआय लोंबार्डच्या नियमांच्या अखत्यारीत असेल. सद्य परीस्थिती अभ्यासून लोकमान्य सोसायटीने ही योजना ग्राहकांच्या सेवेसाठी आणली असून सभासदांनी ह्या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे. लोकमान्य सोसायटी ही सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून नेहमीच ग्राहकोपयोगी योजना अंमलात आणत असते. लोकमान्य सोसायटीच्या 213 शाखा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व दिल्ली येथे कार्यान्वित असून ग्राहकांनी आपल्या नजीकच्या लोकमान्य सोसायटीच्या शाखेत संपर्क करावा, असे कळविले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply