
पनवेल : महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शहरातील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामाची अधिकार्यांसह बुधवारी पाहणी करून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका रूचिता लोंढे, शहर अभियंता संजय कटेकर, अधिकारी श्री. साळुंखे, भाजपचे उमेश इनामदार, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ आदी उपस्थित होते. वडाळे तलावाचे सुशोभीकरण पूर्ण झाल्यावर शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper