Breaking News

नुकसानग्रस्तांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे; तहसीलदारांचे उरणकरांना आवाहन

उरण ः वार्ताहर

उरण तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून 411 घरांचे नुकसान  तसेच महावितरणचे 54 पोल पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील काही भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंढे, वरिष्ठ अधिकारी माणिक राठोड, राजाराम माने व कर्मचारी कार्यरत आहेत. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी प्रशासनाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी ठिकठिकाणी जात आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकारीवर्गाला रहिवाशांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी केले आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे उरण विधानसभा मतदारसंघातील अनेक रहिवाशांच्या घरांचे व इतरही  नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने तत्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त रहिवाशांना तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांनी केली आहे. तसेच खंडित झालेला विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण तसेच एमआयडीसीच्या अधिकारीवर्गाने कामाला लागावे, असे आदेश संबंधित कार्यालयातील अधिकारीवर्गाला आमदार महेश बालदी यांनी दिले आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply