धाटाव : प्रतिनिधी
रोह्याचे माजी नगराध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ नेते सजंय कोनकर यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग याच्या माध्यमातून रोहा येथील लोहार कुटुंबीयांना एक महिन्याचे धान्य देण्यात आले. सजंय कोनकर, युवामोर्चाचे जिल्हा संयोजक राजेश डाके, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रद्धा घाग यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. प्रांताधिकारी यशवंत माने, तहसीलदार कविता जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सजंय कोनकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper