Breaking News

अनुदानाअभावी शिवभोजन थाळी केंद्रचालक उपाशी

खारघर : प्रतिनिधी

कोरोना संकटाच्या काळात कोणीच उपाशी राहु नये म्हणुन राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली, मात्र या शिवभोजन थाळी केंद्रचालकांना मिळणारे अनुदान मागील पाच महिन्यांपासुन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे.

पनवेल तालुक्यात शिवभोजन थाळीचे एकूण 18 केंद्र आहेत.पनवेल शहरी भाग व ग्रामीण भागात या केंद्राद्वारे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या केंद्रावर सध्याचा घडीला गरिबांना मोफत जेवण मिळत आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्यापासुन केंद्रचालकांना अनुदानच मिळाले नसल्याने केंद्रचालकांची उपासमार होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या केंद्र चालकांना अनुदान वाटप करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे.

 शासनाने मोफत शिवभोजन थाळ्या वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यापासून या थाळ्यांची संख्या वाढल्या, पण शिवभोजन थाळी केंद्र चालविण्यासाठी देण्यात येणारे अनुदानच रखडले असल्याने ही योजना राबविणे कठीण झाले आहे, असे पनवेलमधील शिवभोजन थाळी केंद्र चालक म्हणत आहेत.

तालुक्यातील शिवभोजन थाळी केंद्र चालकांच्या अनुदानासंदर्भात आम्ही प्रत्येक महिन्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवत असतो. चालु महिन्याचादेखील अनुदानाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे, असे पनवेलचे प्रभारी पुरवठा अधिकारी एकनाथ नाईक यांनी सांगितले.

सध्या  5 महिन्यांपासूनचे अनुदान  केंद्रचालकांना शासनाकडून प्राप्त झालेले नसल्यामुळे केंद्र चालकांना केंद्र चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तहसील कार्यालय व जिल्हा पुरवठा कार्यालय यासाठी कोणतीही अडवणूक करत नाही, असा माझा अनुभव आहे. तरी शासनाकडून वेळेवर अनुदान प्राप्त झाल्यास ही योजना राबविणे केंद्र चालकांस शक्य होईल. पाच महिन्यांपासून अनुदान रखडल्याने बहुतांशी केंद्र चालकांना कर्ज काढुन केंद्र चालवावी लागत आहेत.

 -नितीन तांबोळी, शिवभोजन थाळी केंद्र चालक, पनवेल

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply