Breaking News

विंधणे तलावात मृत माशांचा खच

वातावरणातील बदलामुळे मत्स्यशेती व्यावसायिकांवर संकट

उरण : प्रतिनिधी

दिवसेंदिवस वातावरणातील होणार्‍या बदलामुळे उरण तालुक्यातील विंधणे येथील मत्स्यशेती करणार्‍या शेतकर्‍याच्या तलावातील दीड ते दोन टनापेक्षा अधिक वजनाचे मासळीचा खच मारून पडल्याने मत्स्यशेतीपालन व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या मत्स्यव्यवसायिकांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे अतिशय मेहेनतीने मत्स्यव्यवसाय करणार्‍या शेतकर्‍याचे मोठे नुकसान परिसरात त्याची खबर मिळताच अनेकांनी येथील विविध प्रकारचे मोठमोठे मासे पाहण्यासाठी गर्दी केली होती.

विंधणे येथील मत्स्य व्यवसायिक गजानन पाटील हे आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी मागील अठरा वर्षे गाव तलावात मत्स्यशेतीचा व्यवसाय करीत आहेत. अठरा वर्षांत अनेक वेळा व्यवसायात चढ उतार आले आहे, परंतु दिवसेंदिवस वातावरणात होणार्‍या बदलामुळे तलावातील पाण्यावर त्याचा परिणाम होऊन ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन त्यामुळे तलावातील मासे, कटला, जिताडी, ऑक्सिजनच्या अभावी मृत्युमुखी पडून पाण्यावर येऊन तरंगू लागली शेतकर्‍यांनी यांत्रिक पंप लाऊन, ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न ही केला, परंतु तलावाचा भाग पाच एकरपर्यंत मोठा असल्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही.

या तलावात दीड ते दोन टनापेक्षा अधिक मासे कटला, ब्रिगेड, जिताडा, सायप्रनिस, तिलापिया अशा प्रकारच्या महागड्या जातीचे मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे या शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे  नुकसान झाले आहे. अशा शेतकर्‍यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी भावना येथील मत्स्य शेतकरी व्यक्त करीत आहेत. मोठे आर्थिक नुकसान झाल्याने या शेततलाव पालन करणार्‍या शेतकर्‍याच्या कुटुंबीयांवर पुरती उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

मत्स्य शेतकरी गजानन पाटील म्हणाले की, माझे नुकसान झाले असे  दुसर्‍या मत्स्य शेतकर्‍यांचे होऊ नये यासाठी आपण  आपल्या तलावातील पाण्याचा पीएच, अमोनियाची मात्रा, तलावातील पाण्यातील होणारे बदल, माशांचे आजार, त्यांच्या शरीरावर होणारे डाग त्यांची वाढ यासर्व गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आपल्याकडे, ओक्सिफ्रेश अमोनिया चेक, एग्रिकलचेर, डोलामाईड चुना किंवा मत्स्यशेतीसाठी लागणारी मेडीसिन असायला हवी. माझ्याकडे या सर्व वस्तू अत्यावश्यक वेळी मिळाल्या नसल्यामुळे आज माझे खूप मोठे नुकसान झाले आहे, मात्र इतर  मत्स्यशेतकरी बंधूंना अशा वाईट परिस्थितीला सामोरे जायला नको यासाठी यागोष्टी असणे गरजेचे आहे.

गेले 18 वर्षे मी मत्स्यशेती करीत आहे, परंतु एवढ्या वर्षांत कधीच एवढे मासे मृत झाले नव्हते. वातावरणात बदल होत आहे. पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे मासे मृत होत असल्याने मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा आहे.

-गजानन पाटील, मत्स्य शेतकरी, विंधणे, उरण

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply