Breaking News

बनावट पोलीस अधिकारी आणि चार साथीदार ताब्यात

महाडमधील घटना

महाड ः प्रतिनिधी
महाड तालुका पोलिसांनी शनिवारी (दि. 18) संध्याकाळी किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे नाकाबंदीदरम्यान एक वाहनातून आलेल्या व पोलीस खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवणार्‍या बोगस पोलीस व त्याच्या चार साथीदारांसोबत ताब्यात घेतले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगड येथे येणार्‍या पर्यटकांची चौकशी करण्यात येत आहे. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गाव हद्दीत महाड तालुका पोलीस ठाण्यामार्फत चौकी तैनात करण्यात आली असून, या ठिकाणी बाहेरून येणार्‍या सर्व वाहनांची तपासणी करूनच किल्ल्यावर सोडण्यात येते. शनिवारी दुपारी 4.30च्या सुमारास नाकाबंदीला असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी महेंद्रा कंपनीची टीयू व्ही-300 गाडी (एमएच 150एफव्ही 7549) थांबवून चौकशी केली. या गाडीमध्ये खाकीत वर्दीत असणारा इसम शैलेश नाना पाटील (वय 32, रा. रबाळे, ठाणे, मूळ गाव नांदेड) हा आपण डीवायएसपी असल्याची बतावणी करीत होता.
अधिक चौकशीत हा अधिकारी बोगस असल्याचे उघड झाले. त्याच्यासोबत वाहनात रवींद्र साहेबराव पाटील (22, बोदर्डे, जळगाव), घनशाम दिनेश पाटील (22, नांदेड, धुळे), अविनाश ज्ञानेश्वर पाटील (26, शेडगाव, जळगाव) आणि समाधान दगडू पाटील (21, खेडगाव, जळगाव) असे इतर चार लोक होते. या पाचही जणांविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 170/171/आणि 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply