आमदार रविशेठ पाटील यांच्या अधिकार्यांना सूचना
पेण : प्रतिनिधी
मुसळधार पावसाने पेण तालुक्यातील बाळगंगा, पाताळगंगा आणि भोगावती या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. आमदार रविशेठ पाटील यांनी मंगळवारी (दि. 20) या पुरग्रस्त भागाची पाहणी केली. व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
अतिवृष्टीमुळे पेण तालुक्यातील खरोशी, कळवे, जोहे, हमरापूर, दुरशेत, रावे, तांबडशेत आदी अनेक गावांमध्ये भातशेती व घरांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी आमदार रविशेठ पाटील यांनी या गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे खरोशी येथे स्मशानभूमीची झालेली दुरवस्था, पडलेली भिंत, विजेचे पडलेले खांब, शेतीची झालेली हानी त्याचबरोबर पावसाचे पाणी घुसून नुकसान झालेल्या घरांची आमदार पाटील यांनी या वेळी पाहणी
केली. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार पाटील यांनी प्रशासकीय अधिकार्यांना दिले.
भाजपचे पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, सरपंच चंद्रकांत घरत, तहसीलदार अरुणा जाधव, मंडळ निरीक्षक सूर्यवंशी, ग्रामसेवक विवेक वास्कर यांच्यासह संबंधित तलाठी, कोतवाल आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper