भाजपच्या राजासेखरन पिल्लई यांची सिडकोकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
कळंबोली वसाहतीतच्या सेक्टर 15 येथील स्मशानभुमीची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे सिडकोने ही स्मशानभुमी दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी भाजप दक्षिण भारतीय सेलचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजासेखरन पिल्लई यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या कळंबोली येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेला पाठविण्यात आली आहे.
पिल्लई यांनी निवेदना म्हटले आहे की, कळंबोली वसाहत सेक्टर 15 येथील स्मशानभुमी दयनीय अवस्था झाली असुन प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सिडकोमध्ये स्मशानभुमीबद्दल तक्रार केली असता त्यांनी उडवाउडावीची उत्तरे देत आहेत. स्मशानभुमी येथे प्रेत जळीत करण्यासाठी घेऊन गेलो असता स्मशानभुमीला संपुर्ण गळती लागली असुन प्रेत जळीत करण्यासाठी नातेवाइकांना अडचण येत आहे. प्रेत जळीत करण्यासाठी घेण्यात आलेली लाकडे पुर्ण भिजलेली असुन प्रेत अर्धवट स्थितीत जळत आहे. त्यामुळे कळंबोळीतील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
मागील दहा वर्षांपासुन कळंबोली स्मशानभुमीसाठी पाठपुरावा करत असुन प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. स्मशानभुमीचे शेड व नागरिकांना बसण्यासाठी बनवलेले शेड दुरवस्था झाली असुन शेड केव्हाही पडण्याची शक्यता आहे. तरी याकडे प्रशासनानी लक्ष्य द्यावे.