Breaking News

नाथकृपा प्रतिष्ठानकडून महाडकरांना मदत

कळंबोली : रामप्रहर वृत्त

कळंबोली येथील नाथकृपा प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांनी महाडजवळील कोंडीवते, आसनपोई, कुणबी आळी महाड शहर या ठिकाणी पूरग्रस्तांना दहा गोणी कपडे, अत्यावश्यक सेवेचे रोजचे लागणार्या सामानाचे साठ किट, दीडशे किलो तांदूळ, प्रथमोपचार औषध व पाण्याचे बॉक्स यांचे वाटप केले.

वस्तूंचे वाटप झाल्यानंतर त्या ठिकाणी काही घरांमध्ये चिखलाची साफसफाई केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तरुण मुले पुढे येऊन सकारात्मक काम करीत आहेत त्यांचे समाज स्तरावरून कौतुक होत आहे. प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते महेश बबन बारगजे, रोहन पवार, किरण मोटे, अक्षय मांढरे, प्रणय हाके, प्रथमेश शिंदे, गौरव वाडके, बंटी मांडे, विपुल भोजने, विलास भोजने, सुरज पिंगळे, सुरज उगले यांनी एकत्रित येऊन मदत गोळा केली. ही मदत एकत्र करून खेड्यापाड्यातील लोकांना वाटप केली. या सर्व टीमचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी कौतुक करून समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply