टोकियो : वृत्तसंस्था
2018च्या रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकेन यामागुचीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात सिंधूने यामागुचीवर संपूर्ण दबाव ठेवला. सिंधूच्या आक्रमकतेपुढे ती टिकू शकली नाही. सिंधूने यामागुचीवर 21-13, 22-20 असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये सिंधूने 11-7 अशी आघाडी घेतली होती. आक्रमक आणि बचाव या दोन्हीमध्ये सिंधूने सुरेख समतोल साधत गेम 21-13 असा जिंकला आणि सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या गेममध्ये विजय मिळवल्यानंतर सिंधूने यामागुचीला दबावात ठेवले. पहिल्या गेममधील विजया पाठोपाठ सिंधूने दुसर्या गेममध्ये 11-6 अशी आघाडी घेतली. पण या आघाडीनंतर यामागुचीने जोरदार कमबॅक केले आणि सिंधूवर 16-15 अशी आघाडी घेतली. अखेर पाच गुणांसाठी दोन्ही खेळडूंमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. प्रथम 16-16 अशी बरोबरी नंतर यामागुचीने 20-18 अशी आघाडी घेतली होती, पण सिंधूने जबरदास्त खेळ करत 20-20 अशी बरोबरी केली. त्यानंतर सलग 2 गुण मिळवत सिंधूने दुसरा गेम 22-20 असा जिंकला आणि टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीत सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा 21-7, 21-10 असा पराभव केला होता. राऊंड 32 मधील लढतीत सिंधूने हाँगकाँगच्या एनवाई चेयुंगवर 21-9, 21-16 असा विजय मिळवला, तर उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट 21-15, 21-13 असा पराभव केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper