Breaking News

ओबीसींची जनगणना करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे जन आशीर्वाद यात्रेसाठी आले असता आगरी कोळी समाज हॉलमध्ये ओबीसींची जात निहाय जनगणना व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसींची जनगणना 2021मध्ये होणार असे जाहीर केले होते, परंतु कोविंड या महामारी मुळे ते चालू करता आले नाही. म्हणूनच यापुढील काळात याच सरकार कडून ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी भाजपचे भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनीसुद्धा यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व कपिल पाटील यांनी मोठ्या मनाने तुमची ही मागणी पंतप्रधानांपर्यंत पोहचवू, असे आश्वासन दिले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply