Breaking News

आराम बस ट्रेलरला धडकली

एक्स्प्रेस वेवरील अपघातात अनेक प्रवासी जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सोमवारी (दि. 30) सकाळी  पुण्याकडून मुंबईकडे जाणारी प्रवाशी आराम बस पुढे जात असलेल्या ट्रेलरला मागून धडकली. या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून अनेक प्रवासी मात्र किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.

महाराजा ट्रॅव्हल कंपनीची आराम बस सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे जाणार्‍या लेनवर किलोमीटर 39 येथून जात होती. त्यावेळी बसने पुढे जात असलेल्या ट्रेलरला पाठिमागून धडक दिली. या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी तर आठ ते दहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची खबर मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, सेव्ह लाईफ, लोकमान्य हॉस्पिटल आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम घटनास्थळी पोहचली. त्यांनी जखमींना एमजीएम हॉस्पिटलमध्ये पाठविले. तसेच दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून, वाहतूक सुरळीत  आली.

हा अपघात झाला तेव्हा पुण्याकडून एक एसआरपीएफची एक वीस जणांची तुकडी मुंबईकडे जात होती. त्यांना अपघात झाल्याचे समजताच तुकडीचे प्रमुख पीएसआय संदेश नाईक यांनी सर्व सहकार्‍यांना घेऊन या अपघातात मदतकार्य केले. बसमधील इतर प्रवाशांना अन्य वाहनातून त्यांच्या नियोजित स्थळी पाठविण्यात आले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply