उरण : वार्ताहर
एपीएम टर्मिनल्स मुंबई (जीटीआय), एपीएम टर्मिनल्स ग्लोबल टर्मिनल नेटवर्कचा एक भाग या नात्याने वाशी एमजीएम हॉस्पिटलच्या सहाकार्याने उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, येथे मोफत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम शिबिर आयोजित केले होते.
पहिले शिबिर गुरुवारी (दि. 9) आयोजित करण्यात आले त्यावेळी 370 डोस नागरिकांना देण्यात आले आणि दुसरे शिबिर शुक्रवारी (दि. 17) घेण्यात आले. त्या वेळेस 130 डोस नागरिकांना देण्यात आले. एकूण 500 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. परिसरातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा या उद्देशाने या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. टर्मिनल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रयत्नांतर्गत शिबिरे घेण्यात आले.
या वेळी लसीकरण मोहिमेला तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, एपीएम टर्मिनल्स मुंबईकडून सुनील शर्मा, दर्शन सागदेव, केव्हीन गाला, प्रवीण हराळे, मनोज पांडे आणि सीएसआर अधिकारी हाफिज शेख, एमजीएम हॉस्पिटलचे विपणन आणि प्रशासन प्रमुख अक्षय कुमार झा आणि इतर हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते.