Breaking News

कर्मवीर जयंतीनिमित्त गव्हाण, जासईत अभिवादन

गव्हाण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी, गोरगरिबांचे कैवारी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व संस्थेचे जनरल बॉडी आणि समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते तिर्थरूप कर्मवीर अण्णा व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर, विश्वनाथ कोळी, उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, उपप्राचार्य जगन्नाथ जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, लाइफवर्कर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे तसेच सर्व रयत सेवक उपस्थित होते.

उरण : रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी, गोरगरिबांचे कैवारी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 134वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कर्मवीर अण्णांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या प्रांगणातील महापुरुषांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कर्मवीर जयंतीनिमित्ताने कर्मवीर अण्णांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. पुष्पमाला व फुलांनी सजलेल्या आणि त्यात कर्मवीर अण्णांची प्रतिमा विराजमान असलेल्या पालखीची मिरवणूक विद्यालयाच्या प्रांगणात घोषणांच्या आतिषबाजीत स्कूल कमिटी, शिक्षक व ग्रामस्थांनी काढली. कार्यक्रमात विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका टी. टी. घरत यांनी विद्यालयास अहुजा कंपनीची एमप्ली फायर मशीन भेट दिली. या सोहळ्यास कामगार नेते व भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, चेअरमन अरुण जगे, माजी सभापती नरेश घरत, व्हॉईस चेअरमन सखाराम घरत, शिक्षणप्रेमी यशवंत घरत, मधुकर पाटील, अमृत ठाकूर, रघुनाथ ठाकूर, धर्मदास घरत, गणेश पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. हा जयंती सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाइफवर्कर अरुण घाग, उपमुख्याध्यापक पी. पी. मोरे, पर्यवेक्षक आर. एस. साळुंखे आणि सर्व रयत सेवकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नूरा शेख यांनी केले.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply