महाड : प्रतिनिधी
पर्यटनाने जगाची आणि देशाची संस्कृती कळते. पर्यटनाने मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळतो, असे प्रतिपादन अल्केमी केमिकल्स कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक पुरुषोत्तम पाटील यांनी येथे केले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ट्रॅव्हल्स आणि टुरिझम विभागातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुरुषोत्तम पाटील बोलत होते.
पर्यटन व्यवसाय करताना संवाद कौशल्य महत्त्वाचे ठरते, असे त्यांनी या वेळी सांगितले.
प्रा. राकेश होणार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एन. एम. नेरकर यांनी केले. पर्यटनामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते असे प्रा. राकेश होणार म्हणाले.
प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला ट्रॅव्हल आणि टुरिझमचे विद्यार्थी, प्रा. दीपक क्षीरसागर, प्रा. कांबळे, प्रा. इशरत संगे, प्रा. साजिद अंतुले, प्रा. नेहा साळुंखे आदी उपस्थित होते. सिद्धी सागडे हिने आभार मानले.