Breaking News

कोर्टाची जनजागृती बाईक रॅली

पेण : प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण देशात जागरूकता आणि संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ हे घोषवाक्य घेऊन पेण न्यायालयाच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती.

पेण न्यायालयाच्या न्या. आर. एन. मुजावर व सहदिवाणी न्या. पी. सी. देशपांडे यांनी या बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. पेण न्यायालयापासून नगर परिषद कार्यालय नाका, चावडी नाका, नंदीमाळ नाका, अंबामाता मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिंचपाडा रोड मार्गे ही बाईक रॅली काढण्यात आली होती. न्या. आर. एन. मुजावर, न्या. पी. सी. देशपांडे, पेण बार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. एन. एन. म्हात्रे यांच्यासह वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पेण न्यायालयाच्या आवारात रॅलीची सांगता करण्यात आली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply