Breaking News

100 कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य कर्मचार्यांचे अभिनंदन

खारघर : रामप्रहर वृत्त

भारताने गुरुवारी (ता. 21) 100 कोटी लसीकरणाचा विक्रमी आकडा पार करून जागतिक स्तरावर अव्वल ठरले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या या ऐतिहासिक क्षणी सर्व आरोग्यदूतांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. या वेळी खारघर-तळोजे मंडल उपाध्यक्षा बीना गोगरी यांनी खारघरमधील सर्व महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांना भेट देऊन तेथील सर्व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे आमदार प्रशांत ठाकूर व खारघर भाजपतर्फे अभिनंदन केले.

मागील नऊ महिन्यांपासून युद्धपातळीवर लसीकरण मोहीम चालवून देशातील नागरिकांना कोरोनापासून संरक्षण देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांना यशस्वी केल्याबद्दल गुलाबाचे फूल देऊन त्यांचे आभार मानले. या वेळी नीता गोगरी, समता मोदी व अंजू पटेल उपस्थित होत्या. खारघरमधील मनुस्मृती, टाटा कॅन्सर रुग्णालय, लिटल वर्ल्ड मॉल व खारघर यूपीएचसी सेन्टर या पनवेल महानगरपालिकच्या लसीकरण केंद्रांना गोगरी यांनी भेट दिली. या वेळी उपरोक्त चारी केंद्रांंवर केंद्र सरकारच्या मोफत लसीकरणाच्या लाभार्थ्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानीतही करण्यात आले. आरोग्य कर्मचार्‍यांनीही आजच्या दिवसाचा आनंद व्यक्त केला व 100 करोड नागरिकांसाठी कोरोनाची लस उपलब्ध करून देऊन लसीकरण मोहीम यशस्वी होण्यास सहकार्य केल्याबद्दल केंद्र सरकारचे, आयुक्तांचे व नागरिकांचे आभार मानले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply