Breaking News

देशातील गुंतवणूकदारांसाठी आरबीआयच्या दोन योजना; पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) रिटेल डायरेक्ट स्कीम आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजनेचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 12) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले. या वेळी पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात आरबीआयने केलेल्या कामाचे कौतुक केले. या कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरबीआयचे गव्हर्नर चित्तरंजन दास यांच्यासह इतर अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. रिटेल डायरेक्ट स्कीममुळे देशातील छोट्या गुंतवणूकादारांना सरकारी सिक्युरिटीजमध्ये (बॉण्ड्स) गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित आणि सहज शक्य होणार आहे, तर रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजनेमुळे ग्राहकांसाठीची तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम आणि सोप्या पद्धतीने काम करण्यासंदर्भातील निर्णय घेतले जातील. वित्तीय संस्था किंवा इतर तक्रारी आरबीआयपर्यंत पोहचवण्यासंदर्भातील माध्यम यामधून ग्राहकांना मिळणार आहे. आतापर्यंत सरकारी सिक्युरिटी मार्केटमध्ये आपल्या देशातील मध्यमवर्गीय, कर्मचारी, छोटे व्यापारी, ज्येष्ठ नागरिक यांना बँक विमा किंवा म्युचुअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करावी लागायची, मात्र आता सुरक्षित गुंतवणुकीसाठी त्यांना एक सोपा पर्याय उपलब्ध झालाय, असे पंतप्रधान मोदींनी या वेळी सांगितले. मागील सहा-सात वर्षांमध्ये केंद्र सरकारने सर्वसामान्य भारतीयांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काम केले आहे. आरबीआयनेही केंद्राला सहकार्य करीत सामान्यांच्या विचार करून महत्त्वाचे निर्णय या कालावधी घेतल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply